नवीन नांदेड l सिडको सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सिडको हडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळासह , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, जगत ज्योती बसवेश्वर महाराज ,महाराणा प्रताप सिंह, माता रमामाता आंबेडकर चौक , व जिजाऊ सृष्टी सिडको येथे मा जिजाऊ यांना मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव समिती सिडकोच्या वतीने मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांचा वतीने हडको सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या सह बसवेश्वर महाराज, अण्णाभाऊ साठे,रमामाता आंबेडकर चौक येथे,व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको, महाराणा प्रताप सिंह,जिजाऊ सृष्टी येथे माता जिजाऊ यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, प्रारंभी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा जवळ जिजाऊ वंदना घेण्यात आली.

यावेळी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय पाटील घोगरे,ऊदयभाऊ देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड,सतिश बसवदे ,राजु लांडगे,धिरज स्वामी, सिध्दार्थ गायकवाड नगरसेविका सौ.बेबीताई जनार्दन गुपीले, डॉ.करूणा जमदाडे,ज्योती पाटील कदम, नवनाथ कांबळे,संकेत पाटील, भगवान ताटे,जयवंत काळे, बिरादार, प्रमोद टेकाळे, गजानन शिंदे, सुभाष सुर्यवंशी, समिती अध्यक्ष त्र्यंबक कदम,दिलीप कदम, साहेबराव गाढे यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार , सामाजिक कार्यकर्ते, विवीध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
