HomeनांदेडByck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले....

Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

उस्माननगर, माणिक भिसे। बारावीचा पहिला पेपर असल्याने जोशी सांगवी ता .लोहा येथील आपल्या मुलाला परीक्षा केंद्रावर घेऊन जात असताना दुचाकीला भरधाव वेगातील हायवाने दिलेल्या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला तर परीक्षार्थी पूत्र व पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास नांदेड ते किवळा रस्त्यावर घडली.

११ फेब्रुवारी रोजी बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. जोशी सांगवी ता .लोहा येथील मुखिन शरीफ साब शेख हे आपल्या एम. एच. २६- बी. वाय. ४४६३ या क्रमांकाच्या मोटारसायकलवर आपला मुलगा फारूख मुबीन शेख व पुतण्या आयान युसूफ शेख अन्य एकजण असे तिघे जण माहूर येथील परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी भल्या पहाटे निघाले. दरम्यान पहाटे ५:४६ वाजता नांदेड – बिदर महामार्गावरील गुंडेगाव शिवारात सुप्रीम गोल्ड पाईप या कंपनीजवळ समोरून येणाऱ्या एम. एच. २२-ए.एन. ७७७७ क्रमांकाच्या हायवाने भरधाव वेगात येऊन धडक दिली. या अपघातात मुवीन शरीफ साब शेख (वय ४५) हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा फारुख मुवीन शेख (१८) व आयान युसुफ शेख (१८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बारावी साठी शिराढोण येथील भिमाशंकर मा. व.उच्च माध्यमिक विद्यालय येथील काॅलेजला प्रवेश साठी रितसर अर्ज दाखल करून कागदपत्रांची पूर्तता केली होती . पण बारावीची परीक्षा ही दुसऱ्या कॉलेज ( माहुर) ला परिक्षा असल्याने सदरील परिक्षार्थी वडीलांना व भावाला घेऊन सकाळी लवकर उठून माहूर येथील कॉलेज घ्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील ढाकणी परिसरात मागून येणाऱ्या मोठ्या वाहनांची मोटारसायकलला जबरीच धडक बसल्याने वडीलाचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला . तर परिक्षार्थी मुलगा व त्याचा भाऊ जखमी झाले आहेत. काळाने झडप घातल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांवर संकट आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments