Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
उस्माननगर, माणिक भिसे। बारावीचा पहिला पेपर असल्याने जोशी सांगवी ता .लोहा येथील आपल्या मुलाला परीक्षा केंद्रावर घेऊन जात असताना दुचाकीला भरधाव वेगातील हायवाने दिलेल्या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू झाला तर परीक्षार्थी पूत्र व पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.४५ वाजण्याच्या सुमारास नांदेड ते किवळा रस्त्यावर घडली.
११ फेब्रुवारी रोजी बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. जोशी सांगवी ता .लोहा येथील मुखिन शरीफ साब शेख हे आपल्या एम. एच. २६- बी. वाय. ४४६३ या क्रमांकाच्या मोटारसायकलवर आपला मुलगा फारूख मुबीन शेख व पुतण्या आयान युसूफ शेख अन्य एकजण असे तिघे जण माहूर येथील परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी भल्या पहाटे निघाले. दरम्यान पहाटे ५:४६ वाजता नांदेड - बिदर महामार्गावरील गुंडेगाव शिवारात सुप्रीम गोल्ड पाईप या कंपनीजवळ समोरून येणाऱ्या एम. एच. २२-ए.एन. ७७७७ क्र...
