किनवट, परमेश्वर पेशवे| सुलतानी व आसमानी संकटाचं वजन पेलत असताना किनवट तालुक्यातील लक्कडकोट गट ग्रामपंचायत मारेगाव खालचे येथील मयत शेतकरी शेतातील कामात व्यस्त असताना अचानक दोडणं रानडुकराने हल्ला केला. यात अंकुश बाळू हसबे वय ५५ यांचा मृत्यू झाला आहे.


रानटी प्राण्यांकडून पीक नासाडी करत असल्यामुळे मयत अंकुश बाळू हसबे वय 55 दिनांक 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता रानटी प्राण्यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतात गेला होता. शेतामध्ये पोहोचल्यानंतर दोन रान डुकराने अचानकपणे हल्ला केला हल्ला. हल्ला एवढा गंभीर स्वरूपाचा होता की, शेतकरी गंभीर जखमी झाला. त्याला लगेच गावकरी मंडळीने खाजगी वाहनांमध्ये टाकून गोकुंदा येथे उपचारासाठी दाखल केले.

गोकुंदा येथे डॉक्टरांनी गंभीर दुखापत असल्यामुळे प्राथमिक उपचार काररून अदिलाबादच्या सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आले. आदीलाबाद येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा पार्थिवावर दिनांक 10 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मारेगाव व लक्कडकोट व तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला. सर्वच शेतकऱ्याला अशा अनेक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे शासनाने या बाबीकडे गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या वारसाला शासकीय मदत लवकरात लवकर देण्यात यावी. असे मत नागरिकांनी व्यक्त केले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी त्यांच्या दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे.
