लोहा| शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षण 2.0 श्री रत्नेश्वरी विद्यानिकेतन स्कूल व एम.आय.टी ज्युनिअर कॉलेज वडेपुरी पहिल्या टप्प्याचे प्रारंभ नुकतेच झाले.


प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण संनियंत्रण अधिकारी म्हणून अंजली कापसे हे होते. प्रमुख उपस्थिती प्राचार्य रेड्डी,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस एन अंबलवाड, बाबुराव फसमले, डी आर शिंदे, केंद्रप्रमुख जी.एस. मंगनाळे, , दत्ता मोहिते, अशोक आढाव , प्रशिक्षण समन्वयक संजय अकोले विषय तज्ञ बालाजी कातुरे, हावगिराव जामकर,पल्लवी चोंडेकर,महानंदा केदारे.

तंत्रस्नेही सर्वजीत धूतराज, परमेश्वर तिडके , संकुल1 चे सुलभक नागोराव जाधव,पी पि.कौशल्ये,यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे चार टप्पे पाडण्यात आलेले असून इयत्ता पहिली ते पाचवी दोन टप्पे तर सहावी ते बारावी दोन टप्पे अशा चार टप्प्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला टप्पा सुरू झाले. २४०शिक्षक प्रशिक्षण घेत असून सुलभक १६ प्रशिक्षण देत आहेत.
