हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्हाचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याला शनिवारी सायंकाळी धावती भेट (Superintendent of Police Abinash Kumar’s visit to Himayatnagar Thane) दिली. यावेळी हिमायतनगर (वाढोणा) येथे दिनांक २४ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान आयोजित श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा उत्सव काळात चोख पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन व यात्रा उत्सव पत्रक देऊन करण्यात आली.



यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, पोलीस निरीक्षक अमोल भगत व इतर पोलिस बांधव उपस्थित होते.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मागणीला अनुसरून यात्रा काळात दरवर्षीप्रमाणे बंदोबस्त ठेऊन महिला, मुली व जेष्ठांना अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. शहर व तालुका परिसरातील कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बारीक लक्ष ठेऊन कायद्याचा बडगा उगारावा अश्या कडक सूचना पोलीस निरीक्षक अमोल भगत याना दिल्या असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला, तसेच पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या विविध कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. 




