Wednesday, May 13

Action : रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे यांचेवर सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाची कारवाई

नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह चे पथक प्रमुख सपोनि श्री संकेत दिघे, यांना नांदेड शहरात रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याकरीता आदेश दिले होते.

IMG 20250203 WA0006 Action : रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे यांचेवर सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाची कारवाई

त्या अनुषंगाने सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाने दि.02.02.2025 रोजी खालील प्रमाणे कारवाई केली. पोस्टे शिवाजीनगर हद्दीतील आनंदनगर येथील राज वाईन शॉपचे चालक यांनी वाईन शॉप येथे वाईन विकण्या सोबतच अवैधरित्या दारू पिण्याकरीता जागा उपलब्ध करून दिल्यावरून नांदेड सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाने 07 इसम व दुकान चालक असे एकुण 08 इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 68 व कलम 64 अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. पोस्टे शिवाजीनगर हद्दीत आयटीआय चौक, येथे वाढदिवासानिमीत्त सार्वजनिक ठिकाणी केक कापणारे 06 इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 प्रमाणे कारवाई केली आहे.

IMG 20250203 WA0005 Action : रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे यांचेवर सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाची कारवाई

पोस्टे विमानतळ व भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालुन शांतता भंग करणारे एकुण 15 इसमांविरुध्द कारवाई करण्यात आली. असे एकुण 29 इसमांवर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संकेत दिघे, सपोउपनि दिपक जोशी, पोकों, ज्ञानेश्वर बोईनवाड, नविद वाहीद, नवनाथ नागरगोजे, विजय सुर्यवंशी, सय्यद मगदुम, शिवराज आडबे, ज्ञानेश्वर तेलंग, प्रविण शिंदे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!