Action : रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे यांचेवर सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाची कारवाई
नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांनी सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह चे पथक प्रमुख सपोनि श्री संकेत दिघे, यांना नांदेड शहरात रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याकरीता आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाने दि.02.02.2025 रोजी खालील प्रमाणे कारवाई केली. पोस्टे शिवाजीनगर हद्दीतील आनंदनगर येथील राज वाईन शॉपचे चालक यांनी वाईन शॉप येथे वाईन विकण्या सोबतच अवैधरित्या दारू पिण्याकरीता जागा उपलब्ध करून दिल्यावरून नांदेड सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाने 07 इसम व दुकान चालक असे एकुण 08 इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 68 व कलम 64 अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. पोस्टे शिवाजीनगर हद्दीत आयटीआय चौक, येथे वाढदिवासानिमीत्त सार्वजनिक ठिकाणी केक कापणारे 06 इसमांविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 प्...
