HomeनांदेडParking problem in front of the court : नांदेडच्या कोर्टासमोर पार्किंगचा विळखा...

Parking problem in front of the court : नांदेडच्या कोर्टासमोर पार्किंगचा विळखा ? वाहनाच्या गर्दीतून काढावी लागते वाट

नांदेड| नांदेड शहरातील मुख्य ठिकाणी असलेले नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय मुख्य इमारतीचा परिसर हा मोटार सायकल पार्किंग (Parking problem in front of the court) म्हणून उपयोग केल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे. इतर कामासाठी आलेले नागरिक देखील न्यायालयाच्या आत बेशिस्त गाड्या लाऊन जाताना दिसत आहेत.

कामानिमित्त न्यायालयात जाणे येणे करताना सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून, वाहनांच्या गर्दीचा हा प्रकार बघायला मिळत असल्याने जायचं कसं असा प्रश्न पुढे येतो आहे. न्यायालयात शेकडो वाहने बेस्तीने पद्धतीने पार्किंग केल्यामुळे कोर्टाच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप होत असून वाहनांच्या गर्दीतून वाट शोधावी लागत आहे.

या कडे कोर्ट प्रशासन, वकील संघ किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालय परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर होत असून, काही जणांना चावा घेतल्याचे समजते आहे, या कडे प्रशासन लक्ष देईल का..? असा सूर येथे कोर्ट कचेरीच्या कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांतून निघत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments