Sanjay Joudhanle ; संजय जौधंळे यांच्या शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश – NNL

नवीन नांदेड l शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जोंधळे यांच्या सह समर्थकांनी शिवसेना गट नेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी सत्कार करून पक्षप्रवेश देण्यात आला.

नवीन नांदेड भागातील वसरणी,नावघाट परिसरातील शिवसेना ऊबाठा गटाचे पदाधिकारी असलेले संजय भाऊ जौधंळे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात शिवसेना गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे आ.हेमंत पाटील यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.

शहरातील नावघाट व वसरणी परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून वर्चस्व असलेले व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळख असलेले व परिसरातील नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे म्हणून ओळख असलेले संजय भाऊ जोंधळे यांची ओळख आहे, पक्ष प्रवेश वेळी शिवसेना पदाधिकारी राजेश पईतवार,मारुती पाटील धुमाळ, दशरथ कंधारे ,सखाराम‌ शितळे ,गोविंद‌ वट्टमवार,शिवराज गुंडाळे,राहुल जोंधळे, विजय पाटील,गुलाबराव घोरबांड ,दिनेश जोंधळे कामाजी कांजाळकर यांच्या सह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button