Homeनांदेडsand reserves will be held : जप्त रेतीसाठ्याचा नायगाव (खै.) येथे बुधवारी...

sand reserves will be held : जप्त रेतीसाठ्याचा नायगाव (खै.) येथे बुधवारी होणार लिलाव -NNL

नांदेड| अवैध्य रेतीचे उत्खनन करून वाहतूक करताना पाडण्यात आलेल्या रेतीसाठ्याचे लिलाव होणार असून, नांदेड जिल्ह्यातील नायगाव (खै.) येथील जप्त रेतीसाठ्याचा बुधवारी लिलाव होणार आहे.

नायगाव (खै.) तालुक्यातील मौ. मेळगाव, सांवगी, धनज परिसरातील सन 2019-2020 मधील 4304.98 ब्रास तसेच सन 2019 मधील मौ. ईज्जतगाव (बु.) येथील 700.00 ब्रास असे एकुण 5004.98 ब्रास अवैध उत्खननातून जप्त करण्यात आले होते. या रेतीसाठ्याचा लिलाव 600 रुपये या दराने उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय नायगांव (खै.) येथे बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वा. ठेवण्यात आला आहे.

लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी यात भाग घ्यावे. लिलावाच्या अटी व शर्ती तहसिल कार्यालय नायगांव (खै.) च्या नोटिस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असे तहसिलदार नायगांव (खै.) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments