नांदेड l “मजबूत भाईचारे की सांज” ही संकल्पना घेऊन नानक साई फाऊंडेशन मागील २१ वर्षापासून पंजाब आणि महाराष्ट्रात काम करत असून नानक-साई ची घुमान चळवळ दोन राज्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचे विश्वासू सेवादार सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा यांनी नांदेड येथे केले.
सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून असलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन’ च्या कार्याला २१ वर्ष व संत नामदेव महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या घुमान सद्भावना यात्रेला ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या अवचीत्याने स्नेहसंमेलन नांदेड येथे हॉटेल सेंट्रल पार्कला आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा नांदेडच्या सामाजिक चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, प्राईम एशिया टीव्ही चे सरदार जोगराजसिंघ कालो,डॉ सरगुनकौर कालो, हरनुरसिंघ देहू, डॉ एकंमकौर देहू, जूगजितकौर देहू ,प्रा.आत्माराम वानुळे, चरणसिंग पवार,सरदार महेंद्रसिंघ पैदल, व्यंकटराव टेकाळे, बबनराव वाघमारे,डॉ गजानन देवकर,श्रेयस कुमार बोकारे, पुंडलिकराव बेलकर, सुभाष गुंडरे,लक्ष्मण धुळगुंडे, बालाजीराव काळे,धनंजय उमरीकर, चंद्रकांत पवार, गंगाधर पांचाळ, दिलीप अनगुलवार, दिगांबरराव कऊठेकर, रामराव मिजगर, सौ मीनाक्षी मिजगर, बाजीराव मनुरकर,बाबू सरोदे, कांचन शेळके,सचिन शिनगारे, यादव मांजरमकर, सौ रंजना मांजरमकर, सौ आशा टेकाळे, पांडुरंग चव्हाण हे उपस्थित होते. घुमान सद्भावना यात्रे त सहभागी आलेल्या यात्रेकरूंना संत नामदेव महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. पंजाबमधील धार्मिक, सामाजिक आणि पत्रकारितेतील निःस्वार्थ सेवेत सदैव अग्रेसर असलेले सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा यांनी कुटुंबासह हुजुर साहिब नांदेड येथे गुरुद्वारा दर्शन घेतले. त्यांचा आणि कुटुंबाचा नानक साई फाऊंडेशन च्या वतीने बोकारे व धुळगुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.