voting awareness : लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान जनजागृतीमध्ये दिव्यांगांचा पुढाकार -NNL

नांदेड| नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकशाही बळकट करणे तसे मतदारांचा सहभाग वाढविणे हा आहे. विशेषतः दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेच्या स्पीप टीमच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना गृहभेटी देऊन त्यांना मतदान प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, आज राजेश हाडोळे या बहुविकलांग नवयुवा मतदारास त्यांच्या घरी भेट देण्यात आली. दिव्यांग मतदारांच्या सहभागातून समाजात सकारात्मक संदेश व मतदानाचे पटवून देण्याचा उद्देश होता.

या गृहभेटीत स्पीप टीमचे कर्मचारी संजय ढवळे व संदीप लबडे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांनीही दिव्यांग मतदारांच्या या पुढाकाराचे कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button