हदगाव| मागील निवडणुकीत ज्या गावात मतदानाची टक्केवारी कमी झाली ती वाढावी म्हणून प्रशासनाच्या वतीने स्विप कक्षाच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या गावात मतदार जनजागृती केली जात आहे. यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
हदगाव तालुक्याचे उप विभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे व तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि,१३ नोव्हेंबर २४ रोजी हदगाव-हिमायतनगर मतदारसंघांतर्गत स्विप कक्षाच्या वतीने हदगाव तालुक्यांतील मागील मतदान टक्केवारी पाहता ५०टक्यापेक्षा पेक्षा कमी मतदान असलेली व अती संवेदनशील असलेली मतदानकेंद्र तथा गावे या ठिकाणी मतदार जनजागृती केली जात आहे.
यासाठी स्विप कक्ष अध्यक्ष किशनराव फोले,श्री. सूर्यकांत बाच्छे,सदस्य श्री.अरविंद सुर्यवंशी,संदेश चोंडेकर, देवकांबळे उदयकुमार,दत्तात्रय पवळे, सुधाकर औरादकर व सर्व सदस्य यांनी सर्व गाव व अंतर्गत आखाडा-वस्ती बांधव यांना मतदानाचे महत्त्व सांगून जनजागृती करण्या संदर्भात आव्हान व विनंती कऱण्यात आली. तसेच सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली यावेळी स्वीप कक्षाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.