HomeनांदेडVinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली...

Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

नवीन नांदेडl नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटात कांकाडीचे माजी सरपंच सुदीन‌ पाटील बागल यांच्या सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला आहे.

शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालय येथे दक्षिण विधानसभा मतदार संघातील कांकाडी,तुप्पा भागासह ग्रामीण भागातील व सिडको हडको परिसरातील व पदाधिकारी असलेल्या दता पाटील कदम तुप्पा उपसरपंच, कैलास बागल ग्रामपंचायत सदस्य,दशरथ पाटील बागल तंटामुक्ती अध्यक्ष,शंभु गंगातीरे, ऋषीकेश भवर,रावण पाटील वर्तळे, उपसरपंच काळेश्वर बागल ,नंदु वर्तळे,प्रदीप कोल्हे, देवानंद हणवते, भागवत भवर , तानाजी भवर , श्रीकांत देशमुख,राजु देशमुख, सर्जेराव वर्तळे,शिवा सोळंके, नंदु वर्तळे या प्रमुख पदाधिकारी यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला आहे.

ऐन निवडणुकीच्या काळात विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेत आहेत.

यावेळी नांदेड दक्षिण तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, शिवसेना सिडको ऊपशहरप्रमुख पप्पू गायकवाड यांच्या सह दक्षिण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments