Homeनांदेड22 new Bolero vehicles : नांदेड पोलीस दलात 22 नविन बोलेरो वाहने...

22 new Bolero vehicles : नांदेड पोलीस दलात 22 नविन बोलेरो वाहने दाखल; निवडणूक काळात अतिमहत्वाच्या कामासाठी होणार वापर -NNL

नांदेड| दिनांक 29.10.2024 रोजी नांदेड पोलीस दलाकरीता आगामी काळातील अतिमहत्वाचे निवडणुक बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तकरीता नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समिती कडुन वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने घटकाकरीता 39 नविन वाहने खरेदी करण्यात आले आहेत.

सदर 39 वाहनात 22 निओ बोलेरो, 15 स्कॉर्पिओ व 02 महिद्रा थार खरेदी करण्यात आले. सदर वाहने खरेदी करण्याकरीता अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड यांनी डिपीडीसी मधुन निधी उपलब्ध करून दिला आहे.

IMG 20241030 WA0038 22 new Bolero vehicles : नांदेड पोलीस दलात 22 नविन बोलेरो वाहने दाखल; निवडणूक काळात अतिमहत्वाच्या कामासाठी होणार वापर -NNL

सदर 22 वाहनाचे पोलीस मुख्यालय नांदेड येथे शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्र नांदेड, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, यांचे हस्ते सदर वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन पोलीस कर्तव्या करीता रवाना करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन चोपडे, पोलीस निरीक्षक एमटीओ, पोलीस मुख्यालय नांदेड, विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड यांनी उत्कृष्टरित्या केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments