HomeनांदेडBoycott on voting is not development : मतदानावर बहिष्कार म्हणजे विकास नव्हे,...

Boycott on voting is not development : मतदानावर बहिष्कार म्हणजे विकास नव्हे, मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| मागील पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर किनवट तालुक्यातील पांगरपाड येथील गावकऱ्यांनी त्यांच्या मूलभूत भौगोलिक सोयीसुविधीसह इतर मागण्यांसाठी मतदानावर बहिष्कार टाकला होता.

जवळपास या घटनेला आता पाच महिने पूर्ण होत आले आहेत तरी त्यांना त्यांच्या हक्काच्या मुलभूत भोगोलिक सोयी सुविंधासह शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी राशन कार्ड धारकांना प्राधान्य अथवा एपीएल बीपीएल राशन कार्ड मध्ये समाविष्ट करून घ्यावे तसेच निराधार महिलांसाठी पेन्शन योजना लागू करावी, रेवानाईक तांडा ते कंचेली रस्त्यावरील पुलाची उंची वाढवून द्यावी, मोबाईल टावर रेंजची सुरुवात करणे, पांगर पहाड ते आमगाव जोड रस्ता करून देणे अशा विविध मागण्या घेऊन गावकऱ्यांच्या वतीने येथील सरपंच महिला सौ संजिरा संदेश जाधव यांनी दिले.

पुन्हा एकदा किनवटच्या तहसीलदार शारदा चौडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केल्याने किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व मंडळ अधिकारी लाटकर तलाठी एम टी बोधे, ग्रामसेवक परमेश्वर झरीकर यांनी पांगरपाड या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन येतील नागरिकांशी त्यांच्या हक्काच्या मूलभूत सोयीसुविधासह इतर मागण्यांवर चर्चा केली असता माझ्या स्तरावर जे काही तुमच्या मागण्या आहेत ते मी सोडवीन व इतर मागण्या आहेत ते मी वरिष्ठांना कळविण असे त्यांनी सांगितले.

असता किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी मतदानावर बहिष्कार म्हणजे तुमचा विकास नव्हे भारतीय संविधानाने तुम्हाला तुमच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जो काही अधिकार दिला आहे तो मतदानाचा अधिकार आपण बजवावा व इतर तुमच्या काही मागण्या असतील त्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात कळवाव्या आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू पण मतदानापासून आपण वंचित राहू नये किंवा मतदानावर बहिष्कार टाकू नये जो काही मतदान करण्याचा आपला अधिकार आहे ते आपण मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली यांनी सर्व मतदार बंधूंना आवाहन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments