Homeनांदेड'Swaratim' University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन - NNL

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन – NNL

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये पीएम उषा (PM-USHA) योजनेअंतर्गत दि.२१ ते २६ ऑक्टोबर दरम्यान ‘कम्प्युटर- एडेड ड्रग डिझायनिंग’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये नवीन औषध संशोधनाबद्दल माहिती आणि त्यासाठी तंत्रज्ञान वापराचे कौशल्य व ज्ञान इत्यादिंचा अंतर्भाव असणार आहे. या कार्यशाळेमध्ये पदव्यूत्तर, संशोधक विद्यार्थी आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेमध्ये बायोविया डिस्कव्हरी सॉफ्टवेअरचा परिचय, डॉकिंग, वर्च्युअल स्क्रीनिंग, एडीएमइटी आणि टीओपीकेएटी, थ्रीडी क़्युएसएआर, फोर्स फिल्ड आणि मिनीमायझेशन, मॉलिक्युलर डायनॅमिक्स सिम्युलेशन यासारख्या विषयावर सखोल चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. आर. बुटले असून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एस. एस. पेकमवार, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. एस. जी. गट्टानी, डॉ. शशिकांत ढवळे, डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. आर.एस. मून, डॉ. टी.एम. कल्याणकर, डॉ. घोळवे, डॉ. कराळे, मनुरे, शेळके, कदम, कल्याणकर, मोरे, माने, चौधरी, अळणे, मस्के यांच्यासह संकुलातील इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments