Wednesday, May 13

former MP Kabde : नांदेड हे पर्यटन यासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे-माजी खासदार काबदे -NNL

नांदेड| नांदेड येथील हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छता महानगरपालिका आणि जनतेने तसेच स्वयंसेवी संस्थांनी करावे. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांचे स्मरण राहिला हवे. नांदेड हे पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण स्थान ठरावे अशी अपेक्षा माजी खासदार तथा मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी केले.

ते 17 ऑक्टोबर 2024 रोजी, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता आयोजित हुतात्मा स्मारक परिसरातील स्वच्छता या विषयावर बोलत होते. डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी पुढे असेही म्हणाले की, ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिल त्यांच्या प्रती कृतज्ञता ठेवणं हल्ली खूप गरजेचे झालेले आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात जुन्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या विसरून चालणार नाही. जुन्या काही घटना समाजासाठी प्रेरणादायी आहेत.

ते पुढे असेही म्हणाले की स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच यांच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम महानगर पालिकेच्या आणि जनतेच्या पुढाकाराने व्यवस्थित राबवल्या जावा. यावेळी एडवोकेट पवार, दिगंबर ढगे, प्रसाद देशपांडे, कामाजी पाटील , स्वातंत्र्य सैनिक यांचे कुटुंबीय यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी हुतात्मा स्मारक स्वच्छ करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!