कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे ऐतिहासिक जुने शहर असून, येथील व्यापारपेठ एक काळ वैभवशाली होती. ही व्यापारपेठ अतिक्रमणाच्या नावाखाली पाडत एकमेकावर कुरघोडी करण्याचे उद्योग येथील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केले.
उध्वस्त बाजारपेठ पुन्हा विकसित व्हावी याकरिता विस्थापित व्यापाऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधीची उंबरवट्टे झिजवले पण त्यांना न्याय मिळाला नाही व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटवावा ही राजकारण्यांची नियत नव्हती.अखेर हातबल झालेले व्यापारी माझ्याकडे आले. आम्ही शिस्टमंडळा सहित जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो.अनेक संकटे आले तरी न घाबरता लढत राहिलो अखेर यश मिळाले लढा यशस्वी झाला. व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दुकाने मिळाली या यशाचे श्रेय जिल्हाधिकारी, प्रशासन व व्यापाऱ्यांचे एकजुटीचे असून तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. व्यापाऱ्यांना पक्की बांधलेली दुकाने उपलब्ध करून कंधारचा विकास करणार असल्याची ग्वाही सेवा जण शक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी दिली.
विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह चौक कंधार येथे सेवा जन शक्ती पार्टी व कंधार येथील व्यापारी बांधवांच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता वचनपूर्ती जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध डॉ.रामराव सदावर्ते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंत सावकार पापिनवार शेख हबु भाई,सेवा जन शक्ती पार्टी चे शहर अध्यक्ष मयूर नळदकर,हैदर भाई शेख,उत्तमराव भागानगरे, ॲड मगदूम शेख,मधुकर मुसळे,चंद्रकांत फुके यांची प्रमुख उपस्थितीती होती. प्रारंभी व्यापारी आघाडी कंधार, भावसार समाज संघटना, भोईराज न्याय हक्क संघर्ष समिती कंधार व सेवा जन शक्ती पार्टीचे कार्यकर्ते यांच्या वतीने प्रा. मनोहर धोंडे यांचा शाल श्रीफळ व भव्य हार घालून सत्कार करण्यात आला.
पुढे सत्कारास उत्तर देताना प्राध्यापक धोंडे म्हणाले की, कंधार शहरातील सर्व सामान्य जनतेचे अनेक प्रश्न असून या शहराचा डी.पी प्लॅन झाला नाही. शहर हे जुने असून भौतिक सुविधा जनतेस मिळत नाहीत शहरात गल्लीबोळात कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत .शहरवासीयांना चार दिवसाला पाणी देण्यात येते .शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत शहरातील अनेक भागातील घरे अद्याप लोकांच्या नावावर लावलेली नाहीत, शहरामध्ये एकच राष्ट्रीयकृत बँक असून तेथे नागरिकाची मोठी गर्दी नेहमीच असते. या सर्व समस्या दूर करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा कंधार तालुका सुजलाम सुफलाम करून शेतकरी, कष्टकरी व्यापारी,सुशिक्षित बेरोजगार, वृद्ध ,महिला, सालदार शेतमजूर,या सर्वांना न्याय देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही प्रा. धोंडे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर दिली.
जे .सी. बी. ने प्रा. मनोहर धोंडे यांच्यावर पुष्पवृष्टी
सेवा जन शक्ती पार्टी कंधार च्या वतीने भव्य मोटार सायकल रॅली आयोजन करण्यात आली होती . ही रॅली घोषणा देत शिवाजी चौक कंधार येथे आली असता व्यापारी बांधव व नागरिकांच्या वतीने प्रा.मनोहर धोंडे यांच्यावर ८ जे.सी. बी .च्या सहायाने पुष्पवृष्टी करण्यात आली . त्यांनी देखील उपस्थित बांधवाचे हात जोडून आभार मांडले या पुष्पवृष्टी ची कंधार शहरात एकच चर्चा होती.