Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister, Deputy Chief Minister : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा संवाद -NNL
नांदेड महाराष्ट्र October 12, 2024

Chief Minister, Deputy Chief Minister : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा संवाद -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा लाभार्थ्यांचा आनंद मेळावा उद्या रविवारी 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अंतिम आढावा घेतला.

संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. उद्या जवळपास 250 बसेस याशिवाय शेकडो खाजगी वाहनाने जिल्ह्याच्या सर्व भागातून महिला उपस्थित राहणार आहे. एकट्या नांदेड शहरातून हजारो महिलांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड महानगरपालिका व नांदेड ग्रामीण भागातील यंत्रणा यासाठी प्रयत्न करत असून आज महिलांना सुरक्षित आणणे, त्यांच्या खाणपणाची व्यवस्था करणे, त्यांच्या पार्किंगची व बैठक व्यवस्था करण्याबाबतची सूचनाही करण्यात आली.

राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी १३ ऑक्टोबरला नांदेड येथे महिला सशक्तिकरण अभियानाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नांदेड येथील नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

विविध मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछडे, हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी बंडप्पा काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भिमराव केराम, आमदार माधवराव पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती असणार आहे. आज आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील तयारीचा आढावा घेतला. त्यांनी नवा मोंढा मैदानाला भेट देऊन बैठक व्यवस्था व पार्किंग संदर्भातील माहिती घेतली.

विविध योजनांच्या लाभार्थ्यांची उपस्थिती
जिल्ह्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जिल्हा प्रशासन या मोठ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहे.

वाहनतळाची व्यवस्था
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातून विविध योजनाचे लाभार्थी व नागरिक यांची मोठया संख्येने येणार असून त्यासाठी प्रशासनाच्यावतीने 249 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेससाठी नांदेड शहरात दोन वाहनतळाची व्यवस्था केली आहे. नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मैदानावर नांदेड मनपा, नांदेड, अर्धापूर, भोकर, मुदखेड, हिमायतनगर या तालुक्यासाठी 170 बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तर यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हदगाव, नायगाव, बिलोली, उमरी, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कंधार व लोहा या तालुक्यासाठी एकूण 129 बसेस पार्किंगची व्यवस्था केली आहे. नांदेड येथील वाहतुकीला कोणताही अडथळा होऊ नये यासाठीही नियोजन केले आहे.

माध्यम प्रतिनिधीसाठी व्यवस्था
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी प्रशासनाच्यावतीने सुक्ष्म नियोजन केले असून कार्यक्रमासाठी येणाऱ्या माध्यम प्रतिनिधीसाठी त्यांच्या वृत्तपत्र व वाहिन्यांच्या ओळख पत्रावर पत्रकार कक्षापर्यंत प्रवेश मिळणार आहे. या ठिकाणी वेगळी आसन व्यवस्था केली आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक योजनेचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येणार असून त्यांच्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.येणाऱ्या नागरिकांसाठी भव्य मंडपाची व्यवस्था केली आहे.

असा असेल कार्यक्रम
दुपारी अकरा वाजल्यापासून जिल्हाभरातून येणाऱ्या भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पैठणीच्या वाटपाचा कार्यक्रम देखील होणार आहे. महिलांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील या ठिकाणी होणार आहे. जागेवरच होणाऱ्या या स्पर्धेत उद्या शेकडो पैठणीचे वाटपही केले जाणार आहे.

दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होईल.त्यानंतर गोमाता पूजन व या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्टॉलची उद्घाटन करण्यात येईल. कार्यक्रमाचे अधिकृत उद्घाटन केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक कळ दाबून होईल. त्यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रॅम्पवरून मुख्यमंत्री व मान्यवर लाभार्थ्यांशी संवाद साधतील.

मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर विविध लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, धनादेश वाटप व सत्कार केला जाणार आहे.दुपारी तीनच्या सुमारास मान्यवरांच्या भाषणांना सुरुवात होईल.साडेतीन वाजता मुख्यमंत्री सभेला संबोधित करतील.सभास्थळावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री 4.30 वाजता मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण प्रयाण करतील 4.45 शासकीय विमानाने नागपूरकडे ते प्रयाण करतील.

फेसबुक पेजवर लाभार्थी
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या पथदर्शी योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनेक मुलाखती घेण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्या ” जिल्हा माहिती कार्यालय नांदेड ” या फेसबुक पेजवर आपल्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया उपलब्ध करण्यात आल्या आहे. याशिवाय उद्या या सर्व लाभार्थ्यांच्या मुलाखती या ठिकाणी दाखविल्या जाणार आहेत.

at Nava Mondha Maidan of Nanded Chief Minister Deputy Chief Minister's interaction today
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleZilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL
Next Article Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न – NNL

November 12, 2024

Chief Minister my beloved sister | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेडच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबीर -NNL

July 20, 2024

Hadgaon : हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आजी माजी आमदार खासदार एका मंचावर दिसणार

August 20, 2025

22 stolen bicycles seized : भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची मोठी कामगिरी; २२ चोरीच्या सायकली जप्त, आरोपी अटकेत

December 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर

Bhokar ; पूरग्रस्त भोकर तालुक्यात आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

Special Gram Sabha ; शहापूर येथे विशेष ग्रामसभा संपन्न;  तंटामुक्त समिती स्थापन – NNL

सुमेधराज (कांबळे) हिंदोळकर यांची केंद्रीय राजपत्रित अधिकारी वर्ग- १ पदी निवड -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?