HomeकृषीNCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी -...

NCCF ; एनसीसीएफ मार्फत आधारभूत दरानुसार मुग, उडीद व सोयाबीन खरेदी – NNL

नांदेड | महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड व एनसीसीएफ कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व एनसीसीएफ मार्फत मुग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबरपासुन सुरु झाली आहे. प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबरपासून आणि सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासुन सुरु करण्यात येणार आहे.

एनसीसीएफद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 14 खरेदी केंद्र मंजूर आहेत. त्याच्यामार्फत शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत मुग, उडिद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे.

त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मुग, उडिद व सोयाबीन विक्रीसाठी आपल्या गावाजवळील एनसीसीएफच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक खरेदी केंद्रावर घेवून जावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, उपाध्यक्ष रोहीत दिलीप निकम, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक श्रीघर बी. डुबे-पाटील व सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments