Homeक्राईम150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे...

150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

नांदेड| जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.

FB IMG 1727955436152 150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 150 मोबाईल किंमत 23,40,500/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे “Nanded Police” या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायबर पो.स्टे. नांदेड येथून मोबाईल घेवून जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

FB IMG 1727955439995 150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, नांदेड डॉ. श्री खंडेराय धरणे, भोकर, गृह पोलीस उपअधिक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोनि धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.स्टे सायबर पोउपनि एम.बी. चव्हाण, पोलीस अमंलदार सुरेश वाघमारे, राजेन्द्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद पिडगे, मोहम्मद असीफ, विलास राठोड, काशीनाथ कारखेडे किशोर जैस्वाल, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांनी पार पाडली. मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी CEIR पोर्टलवर आपले गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती अपलोड करण्याचे अवाहन केले आहे. सदर कामगीरी बाबत पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

FB IMG 1727955433099 150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments