150 android mobile : नांदेड जिल्हयातील मोबाईल मिसींग मधील 23,40,500 /- रूपयाचे 150 अँड्रॉईड मोबाईल हस्तगत -NNL
नांदेड| जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरीता मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पो.स्टे. सायबर पोनि धिरज चव्हाण यांना आदेशीत केले होते. त्यानूसार सायबर सेल, स्था.गु.शा. व नांदेड जिल्हयातील सर्व पोस्टेचे पथक तयार करून मिसिंग मोबाईलचा शोध घेणेची मोहीम राबविण्यात आली होती.
नांदेड येथील पोलीस स्टेशनचे व स्थागुशाच्या पथकाने जिल्हयातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणी जावून नांदेड जिल्यातील एकूण 150 मोबाईल किंमत 23,40,500/- रूपयाचे हस्तगत केले आहेत. त्यांचे आज एकत्रितरीत्या मा. पोलीस अधिक्षक साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शोध झालेल्या मोबाईलचे IMEI क्रमांकाची माहिती नांदेड पोलीस दलाचे "Nanded Police" या Facebook Page व Twitter वर टाकण्यात आली आहे. त्यापैकी नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक ओळखुन सायब...

