Friday, May 15

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन -NNL

नांदेड| कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टिकोनातून राज्यातील नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या योजनेचे उदघाटन शुक्रवारी 20 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल/ऑनलाईन पध्दतीने नांदेड जिल्ह्यातील 25 महाविद्यालयामध्ये होणार आहे. तरी युवक-युवतीनी या योजनेच्या उद्घाटनासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!