HomeनांदेडSarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची...

Sarpanch of Panshevadi : पानशेवडी च्या सरपंच पदी श्रीमती उज्वलाबाई मोरे यांची बिनविरोध निवड -NNL

कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील मौजे पानशेवडी येथील पूर्वीचे सरपंच सौ गेनुबाई चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यामुळे कंधारचे तहसीलदार गोरे यांनी आदेश देत सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करून १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन मंडळाधिकारी शेख एम. एन. ग्रामसेवक बालाजी भायेगावे यांच्या प्रमुख उपस्थित ग्रामपंचायत कार्यालय पानशेवडी येथे घेण्यात आली. सरपंच पदासाठी उज्वलाबाई मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून सर्वांना मते निवड करण्यात आली.

यावेळी गेनुबाई चव्हाण, कचरूबाई मोरे, अॅड शिवाजी मोरे चंद्रकांत मोरे उषा बसवंते नागीनबाई भालेराव, सुमित्रा नरवडे, हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. श्रीमती मोरे ह्या आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ. आशाताई शिंदे यांचे कट्टर समर्थक कोंडीबा मोरे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या निवडीचे आमदार श्यामसुंदर शिंदे, सौ.आशाताई शिंदे, सभापती विक्रांत दादा शिंदे, आंबड चे तहसीलदार विजय चव्हाण, ज्ञानेश्वर चोंडे, भगवान पाटील मोरे, जळबा पाटील मोरे आदींनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments