नांदेड| मागील आठवड्यामध्ये नांदेड तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. तसेच नांदेड शहरात अनेक सकल भागात नागरिकांच्या घरात पाणी गेल्यामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रूपये तर मनपा क्षेत्रात प्रती कुटूंबास 25 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी महेशकुमार वडदकर यांना दि.10 सप्टेंबर रोजी निवेदन देवून करण्यात आली.
नांदेड तालुक्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, कापूस, ज्वारी इतर शेतीतील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकर्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी तसेच नांदेड महानगरपालिका हद्दित अतिवृष्टीच्या पावसाने घरांचे नुकसान झाले. घरात पाणी साचून दैनंदिन उपजिवीकेचे साधने, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, अन्नधान्य आदी प्रकारचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिकुटूंबास 25 हजार रूपये आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शहर डॉ. सुनील कदम, प्रदेश उपाध्यक्ष महिला सौ.कल्पनाताई डोंगळीकर, जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पा.आलेगावकर, गंगाधर कवाळे, शफी उर रहेमान,जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापुरकर, युनूस खान, युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हाध्यक्षा महिला सौ.सिंधुताई देशमुख, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष फैजल सिद्दीकी, चिटणीस भिमराव क्षिरसागर, उत्तर विधानसभा अध्यक्ष गजानन वाघ, कार्याध्यक्ष जयेंद्र पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहूल जाधव, ओबीसी जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन, ग्राहक सेल जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, शिख सेल जिल्हाध्यक्षा प्रेमजीतकौर कोल्हापुरे, महिला उपाध्यक्षा हसीना बेगम, उत्तर विधानसभा उपाध्यक्ष अश्विन सरोदे, सरपंच अशोकराव भोजणे, गजानन पवार, राजेश सोनाळे, माणिक बोडके, शक्ती ठाकुर, मो.असिफ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.