HomeनांदेडHonorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने' गुणवंतांचा सत्कार...

Honorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने’ गुणवंतांचा सत्कार संपन्न -NNL

लोहा| साठच्या दशकात गोरगरीब गरजवंत व ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी डॉ-बानासाहेव आवेडकर मुलांचे वसतीगृह व कंधार येथे रमामाना मुलींचे वसतीगृह सुरु करून हजारो विद्याथ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे कालवश संभाजीराव धुतमल यांच्या बाराव्या पुण्य स्मरणा निमित्र’ जिज्ञासा ‘अभ्यासिकेत’ गुणवंताचा गौरव सोहळा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका कमलबाई संभाजीराव धुतमल होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार माजी उपनगराध्‌यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, भास्कर पाटील पवार, दता शेटे, आयोजक माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , जिज्ञासाचे संस्थापक हरिहर धुतमल यांची उपस्थिती होती.

सतरच्या दशकात बोर्डिंग मध्ये शिकलेले प्रा-डॉ घनश्याम गोरे (लोहा) लोह्याचे भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक भिमानंद महाबळे (लोहा) प्रा.डॉ. संतोष हंकारे (बोरगाव) प्रा. अमृत जाधव (लोहा) प्रा. डॉ. शैलेंद्र महाबळे (लोहा), पोलीस पाटील श्रीरंग महाबळे (लो हा) देविदास एडके (खडक मांजरी) विशाल महाबळे (लोहा-आदर्श शिक्षक) ,वसतिगृहाचे दीर्घकाळ व्यवस्थापक राहिलेले अरुण धुतमल पत्रकार , रत्नाकर महाबळे, बापूसाहेब कापूरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल ,पुष्पहार स्मृतीचिन्ह गौरव करण्यात आला.

IMG 20240906 WA0081 Honorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने' गुणवंतांचा सत्कार संपन्न -NNL

यंदाच्या पोलीस भरतीत यशस्वी झालेले रोहण खिल्लारे (लोहा -नांदेड पोलीस) जिज्ञासा मधील विद्यार्थी नितेश हंकारे (एसआरपी – हिंगोली ) सतीश शिंदे (नांदेड़ पोलीस) बंडू जाधव (सोनमांजरी तांडा – नांदेड पोलीस) शिवा पांचाळ बेरळी (कोर्टात सेवक ) प्रसाद राजकौर ( लोहा – मुंबई पोलीस) गौरव विजयानंद ढगे (एमबीबीएस प्रवेश-सोलापूर रा. सायाळ ) तसेच व्यवस्थापक बालाजी धनसडे, नामदेव बुध्दे, एडके यांचा . शाल . स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

IMG 20240906 WA0080 Honorable meritorious : लोह्यात माजी उपनगराध्यक्ष कालवश संभाजीराव पुण्यस्मरण निमिताने' गुणवंतांचा सत्कार संपन्न -NNL

पीएसआय भीमानंद महाबळे, प्रा.डॉ घनश्याम गोरे, देविदास एडके यांनी कालवश संभाजीराव धुनमल यांच्या कार्याचा गौरव केला त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहोत असे सांगून कमलबाई व संभाजीराव धुतमल या दाम्पत्यांच्या सामाजिक कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. हरिभाऊ चव्हाण दना शेटे यांनी संभाजीरा धुतमल यांच्या कार्याच्या आठवणी सांगितल्या. छत्रपती धुतमल , हरिहर धुनमल ,प्रमोद धुतमल व मान्यवरांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हरिहर धुतमल यांनी तर संचलन व आभार रत्नाकर महाबळे यांनी केले. सतीश निखाते, शेख सिंकदर, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे, बुध्दे, राजाभाऊ बनसोडे, लक्ष्मण एंगडे ,बुद्धभूषण खिल्लारे यासह मान्यवर ,आप्तस्वकीय ,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थिती होते ,

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments