Teacher’s Day and Sri Chakradhar Swamy’s birth anniversary : हु. ज. पा. महाविद्यालयात शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी -NNL

हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. व श्री. चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात . संपूर्ण शिक्षकांचा मान व सन्मान व आदरभाव प्रगट करण्यासाठी च्या शिष्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हे पटवून दिले. व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा प्रकाश व विचारप्रणालीचा उल्लेख करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी असलेला दृष्टिकोन सांगितला.

अशाप्रकारे त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या वतीने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मांडले. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. डी के माने सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सर्वज्ञ श्री चक्रधारा प्रभू कलियुगातील अंतिम अवतार त्यांना श्रीकृष्णाचा अवतार मानले जाते. महानुभाव मानतात. श्री चक्रधर स्वामी आजही हिमालयातील बद्रिका श्रमात जिवंत आहेत असे मानतात.

महानुभाव पंथ किंवा महानुभाव पंथाची स्थापना 1160 ते बाराशे च्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींनी केली आहे. हा पंथ मोक्षावर चालतो. याला पंजाब मध्ये जय श्री कृष्ण संप्रदाय असेही म्हणतात. त्यांची महाराष्ट्र मध्यप्रदेश आंध्रप्रदेश आणि गुजरात मध्ये सोळाशे पन्नास मंदिरे आहेत. असे आपल्या मार्गदर्शनात त्यांनी मांडले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. देशमुख डी.सी. व आभार प्रदर्शन डॉ.एम.पी गुंडाळे सर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button