Teacher’s Day and Sri Chakradhar Swamy’s birth anniversary : हु. ज. पा. महाविद्यालयात शिक्षक दिन व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी -NNL
हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. व श्री. चक्रधर स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात . संपूर्ण शिक्षकांचा मान व सन्मान व आदरभाव प्रगट करण्यासाठी च्या शिष्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे हे पटवून दिले. व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा प्रकाश व विचारप्रणालीचा उल्लेख करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी असलेला दृष्टिकोन सांगितला.
...
