नांदेड| पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एनटीसी मिल परिसरात पाणी घुसलेल्या घरात लायन्स परिवारातील सदस्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाचशे नागरिकांना लायंसचे डबे दिल्यामुळे बाढपिडीतांना दिलासा मिळाला.
मंगळवारी दुपारी दिलीप ठाकूर,लायन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील,सचिव गौरव दंडवते,कोषाध्यक्ष दिपेश छेडा, संतोष भारती, सुरेश शर्मा, विलास वाडेकर,सुरेश बाबानी यांनी नल्लागुट्टा चाळ, देगाव चाळ, मार्कंडेय मंदिर परिसरात घराघरात जाऊन जेवणाचे डबे वाटप केले. अनेक घरात गुडघ्या इतके पाणी साचले असल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. एकाही घरात अन्न शिजले नव्हते. त्यामुळे वरण भात ,भाजी चार पोळी असलेला लायन्सचा डबा मिळाल्यामुळे पूरग्रस्तांनी पोटभर जेवण केले.व्यंकटेश पंजाला, अनिल गाजूला, तुम्मा भास्कर, शिवरात्री सत्यम, एलगंटी गोविंदा, गणेश शेट्टी, नक्का किरण, बत्तीनी साई, शिवरात्री श्रीनिवास, लोकम्म मनोहर, ताल्ला रमेश यासह अनेक नागरिकांनी लायन्स परिवाराला धन्यवाद दिले.
लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या आवाहानाला प्रतिसाद देऊन आतापर्यंत दोन हजारापेक्षा जास्त जेवणाचे डबे दानशूर नागरिकांनी दिले आहेत. नवीन नोंदणी केलेल्यामध्ये सतीश सुगनचंदजी शर्मा यांच्यातर्फे पाचशे तर सुनील साबू यांच्यातर्फे चाळीस तसेच रमाकांत भंडारे यांनी तीस डबे दिली आहेत.स्वप्निल चव्हाण,भानुदास काब्दे,रामदास बाबुराव कडतन, सुषमा हुरणे यांनी प्रत्येकी वीस डबे दिले आहेत. यापूर्वी माधव एकलारे यांनी ५००, धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर १००, बलजीतकौर रामगडिया यांनी ५० डब्यासाठी देणगी दिली आहे.प्रत्येकी ४० डबे देणाऱ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाजन,शिवाजीराव पाटील, दिलीप मोदी,रवी कडगे,नरेश व्होरा,दीपेश छेडा,सुधाकर चौधरी, राजेंद्र हुरणे ,वसंत आहिरे ,शिवाजीराव शिंदे,गजानन जोशी,अजय अग्रवाल ,पवनकुमार रमेशचंद्र सारडा,अग्रवाल जिल्हा महिला मंडळ,प्रगती निलपत्रेवार,शंकरराव कामीनवार ,डॉ. अरुण हिवरेकर ,सुधीर विष्णुपुरीकर यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी २० डबे पारुल जैन,अग्रवाल महिला मंडळ नांदेड शहर, सुधाकर जबडे देगलूर यांनी दिले आहे.
पूर ओसरे पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. हा उपक्रम सुरू असेपर्यंत अन्नदात्यांची यादी सोशल मीडियावर पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांपर्यंत वारंवार वायरल केली जाईल.यासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी लायन्स परिवारातील सदस्याशी संपर्क साधावा. अन्नदात्यांच्या हस्ते चार पोळी, भाजी वरण-भात असलेले ४० जेवणाचे डबे देण्यात येणार आहेत.तरी पूरग्रस्तांसाठी लायन्सचा डबा या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त दानशूर नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनलायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष ला. शिवाजीराव पाटील, सचिव ला. गौरव दंडवते, कोषाध्यक्ष ला.दिपेश छेडा, प्रोजेक्ट चेअरमन ला. धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.