Homeक्राईमSuperintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन...

Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांनो…सावधान…नांदेड पोलिसांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे सणासमोर विम्याच्या रक्कमेसाठी आपल्यास खात्यात पैसे टाकण्याकरीता फ्रॉड कॉल करून आपल्याला OPT टाकुन पुन्हा OTP विचारणा करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेणारे सक्रिय होतील. यासाठी शेतकरी बांधवानी सतर्क राहणे गरजेचे असून, शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉल पासुन शेतकऱ्यांनो सावधान राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी केले आहे.

सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली शेतकरी बांधवानो तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल. जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे बैंक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते. म्हणुन जनतेने आणि विशेषतः शेतकरी खालील सुचनांचे पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

* अनओळखी मोबाईल क्रमांकावरून शेती विमा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या नावाखाली कॉल आला त्यावर विश्वास ठेवु नये व आपली माहीती सांगु नका.
* शेती विमा संदर्भात तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी पाठवल्यास ते शेअर करू नका.
* शेतकरी बांधवानो या फसवणुकीबद्दल सावध व्हा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासुन तुम्ही वाचाल.
* अशाप्रकारे आपल्या मोबाईल मधील अॅक्सेसची अनावश्यक परवाणगी मागणारे अॅप किंवा त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.

तुमच्या सोबत अशा प्रकारची फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. सायबर शाखा टोल फ्रि नंबर 1930, असुन, राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळ (http://cybercrime.gov.in/). सायबर पोलीस स्टेशन, नांदेड फोन क्रमांक 02462-24027, असा आहे. ईमेल-(cybercell.nanded@mahapolice.gov.in) यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments