Superintendent of Police Abinash Kumar : शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉलपासुन शेतकऱ्यांनो सावधान – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL
नांदेड,अनिल मादसवार| शेतकऱ्यांनो...सावधान...नांदेड पोलिसांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे सणासमोर विम्याच्या रक्कमेसाठी आपल्यास खात्यात पैसे टाकण्याकरीता फ्रॉड कॉल करून आपल्याला OPT टाकुन पुन्हा OTP विचारणा करून आपल्या खात्यातील पैसे काढुन घेणारे सक्रिय होतील. यासाठी शेतकरी बांधवानी सतर्क राहणे गरजेचे असून, शेतीच्या विमा निमीत्त येणाऱ्या फॉड कॉल पासुन शेतकऱ्यांनो सावधान राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांनी केले आहे.
सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली शेतकरी बांधवानो तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल. जर तुम्ही सांगितलेल्या लिंकवर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. ज्...
