नवीन नांदेड| गेल्या दोन ते तिन दिवसांपासून संततधार पावसामुळे गोदावरी नदीला महापुर आला असुन विष्णुपूरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदीला महापुर आल्याने नांदेड मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक १९ मधील नदी काठाचा लगत असलेल्या अनेक वसाहती मध्ये मध्यरात्री अचानक पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने जुना कौठा ,वसरणी,यशोधरा नगर वसाहती मध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार उपयोगी वस्तू नासधूस झाली असुन मध्यरात्री नागरीकांनी सुरक्षीत स्थळी धाव घेतली तर सकाळी वसाहती मध्ये मोठया प्रमाणात पाणीच पाणी झाले.
महसूल व मनपा प्रशासनाने पाहणी केली असून मनपा प्रशासनाने पाच अपती निवारण केंद्र स्थापन केली असून जिल्हा परिषद शाळेत तात्पुरती व्यवस्था केली असून सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक, वसुली लिपीक, स्वच्छता निरीक्षक यांनी पाहणी करून साफ सफाई कर्मचारी यांच्या मार्फत पाण्याचा निपटारा व स्वच्छता केली.
मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नदीकाठच्या जुना कौठा,नवीन कौठा,वसरणी,येथील पंचवटी व शंकरनगर भागात तर यशोधरा नगर ,व सिडको हडको परिसरातील अनेक सखल भागातील संततधार पावसामुळे पाणीच पाणी झाले,गोदावरी नदीच्या महापुराचा पाणी शिरल्याने अनेक नागरीकांनी मध्यरात्री तात्काळ सुरक्षीत स्थळी स्वताहून स्थालंतरीत झाले, महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे, तलाठी वसरणी सुर्यवंशी, माजी नगरसेवक संजय मोरे, पोलीस पाटील लवकुंश अवनुरे यांनी पाहणी केली, मनपा सिडको सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे व वसुली कर निरीक्षक मारोती सारंग, संजय नागापुरकर,प्रकाश दर्शने,व स्वच्छता निरीक्षक अर्जून बागडी, किशन वाघमारे,व वसुली लिपीक यांनी सखल भागातील वसाहती व खुल्या जागेत साचलेले व रोडवर आलेले पाण्याची पाहणी करून साफसफाई कर्मचारी यांच्या मार्फत निपटारा केला असुन अनेक भागातील पाणी काढणे चालुच आहे,अपाती निवारण अंतर्गत पाच ठिकाणी नागरीकांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून जिल्हा परिषद शाळा जुना केला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसरणी, वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी, इंदिरा गांधी महाविघालय सिडको, पद्मश्री शामराव कदम होमीओपॅथी महाविद्यालय हडको, या ठिकाणी करण्यात आली आहे.