Manpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL

नवीन नांदेड। नांदेड जिल्ह्यातील संततधार पावसाच्या नंतर विष्णुपूरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून आकरा दरवाजा ऊघडण्यात आल्याने जुन्या नांदेड मधील जोडणारा मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेला नावघाट पुलावरून पाणी वाहत असल्याने २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मनपा व जिल्हा प्रशासनाने दुतर्फा वाहतूकीसाठी बंद केला असून मोठया प्रमाणात पुर पाहण्यासाठी गर्दी केली होती, नदीकाठी असलेल्या मुझामपेठ भागातील काही कुटुंबे तात्पुरते शाळेत स्थालंतरीत केली असून मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे व तलाठी सोनटक्के हे घटनास्थळी असून ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.


नांदेड जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे विष्णपुरी जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होत असल्याने ११ आकरा दरवाजे उघडले असून २ सप्टेंबर रोजी मोठया प्रमाणात काठोकाठ पाण्याचा प्रवाह असल्याने वसरणी येथील जुन्या नांदेड मध्ये जाणाऱ्या नाव घाट पुल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत व मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार हा पुल बंद करण्यात आला असून धनेगाव मुझामपेठ ग्रामपंचायत हदतील मुझामपेठ भागातील नदीच्या काठी असलेल्या काही कुंटंबे तात्पुरते शाळेत स्थालतरीत करण्यात आले असून नांदेड तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अनिल धुळगुंडे,वसरणी तलाठी कैलास सुयंर्वशी, धनेगाव दिपक सोनटक्के यांच्या सह मनपाच्या सिडको क्षेत्रीय अधिकारी संभाजी कास्टेवाड यांच्या सह मनपाचे माजी नगरसेवक संजय मोरे, धनेगाव ग्रामपंचायत सदस्य तातेराव ढवळे, अब्दुल गफुर शेख,शेख फारुक शेख गफुर,रफिक भाई, माजी पोलीस पाटील गोपीचंद धनेगावकर, पोलीस पाटील प्रतिनिधी तुकाराम येलगंदवार,वसरणी पोलीस पाटील लवकुश अवनुरे,यांच्या सह ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर भोसले व पोलीस कर्मचारी यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

आपतकालीन परिस्थिती मध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली असून जीवरक्षक दल तैनात करण्यात आला आहे, सकाळपासून मोठया प्रमाणात गर्दी पाहण्यासाठी महिला युवक नागरीक यांनी गर्दी केली आहे. मनपा हद्दीत असलेल्या एस्टीपी नाला असलेल्या वसरणी भागातील पंचवटी नगर अनेक घरात पाणी शिरल्याने पाहणी केली असून पाणी शिरकाव येताच नागरिकांनी निवासस्थानी मधुन बाहेर पडली, माजी नगरसेवक संजय मोरे यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ सुचना दिल्या असून जिल्हा परिषद शाळेत राहण्याची सोय केली आहे.


नव्याने करण्यात आलेल्या साईबाबा कमान ते वसरणी वाहतूक नव्याने केलेल्या पुलामुळे वाहतूक सुरळीत आहे, परंतु नाल्यामुळे पाणी शिरल्याने अनेक संसार उपयोगी वस्तू नासधूस झाली असून क्षेत्रीय कार्यालय सिडको वसुली लिपीक रमेश यशंवतकर यांनी पाहणी केली तर वसरणी शंकर नगर भागातील नदीच्या काठावर अनेक घरात पाणी शिरल्याने मध्यरात्री धावपळ सुरू झाली व सुरळीत ठिकाणी स्थलंरीत झाले, तर परिसरात असलेल्या गोळाशाळेत असलेल्या गायी परिसरातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी नेल्या. परिसरात अनेक भागात पाणीच पाणी शिरल्याने अनेक संसार उपयोगी समानाची नासधूस झाली आहे.




