नवीन नांदेडl नांदेड ग्रामीण स्टेशन हद्दीत असलेल्या अनेक गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण होणार असून पोलीस बंदोबस्त प्रत्येक गावात देण्यात आला असून विष्णुपूरी, धनेगाव, गोपाळचावडी या तिन गावात मंगळवारी बैलपोळा सण साजरा होणार आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जवळपास ३७ गावात सोमवारी २ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा होणार, या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार, महिला पोलीस कर्मचारी, होमगार्ड बंदोबस्त साठी गावनिहाय देण्यात आले आहेत अशी माहिती गोपनिय शाखेचे बालाजी दंतापल्ले यांनी दिली आहे.