Ganpat Narwade retired : मुख्याध्यापक गणपत नरवाडे ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

नवीन नांदेड| शिक्षण प्रसासक मंडळ संचलित प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा हडको नांदेडचे नरवाडे गणपत भुजंगराव (पाटील)हे प्रदिर्घ सेवेतून नियत वयोमाना नूसार दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत होत आहेत. त्या निमित्ताने सेवापुर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन गुरुकृपा मंगल कार्यालय हडको येथे सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा हडको येथे १ डिसेंबर ९३ रोजी मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यानंतर शाळेत शाळा व्यवस्थापन बैठक, पालक मेळावा,व विविध उपक्रम राबविणे, संस्कृत कार्यक्रम आयोजन,शाळेच्या गुणवतेत वाढ, यासह अनेक योजना राबविण्यात व क्रीडा स्पर्धा मध्ये शाळेच्या सहभाग घेणे यासह अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे, पालक व विधार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून ३१ वर्षे सेवा करुन ३१ आगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

सेवानिवृत्त निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थाचालक दलित मित्र, पांडूरंग माणिकराव वाघमारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नागराज बनसोडे गट शिक्षणाधिकारी पं.स. नांदेड,गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती हिमायतनगर,व्यंकट पाटील शिक्षण विस्तार अधिकारी पं.स. नांदेड, खेडकर एस.एन, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.नांदेड, सुरेश पाटील शिक्षण विस्तारअधिकारी पं.स ,संग्राम यादवराव कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी पं.स.नायगाव, चंद्रकांत मेकाले, केंद्रप्रमुख लोहा,मगरे, एल, एस, केंद्रप्रमुख माळकोठा ता. मुदखेड मटके, केंद्र प्रमुख सिडको,

माचलोड एस.एल.माजी मुख्याध्यापक, इंदिरा गांधी हायस्कुल, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, श्रीमती इंदूताई शिवाजीराव घोगरे पाटील नगरसेविका सौ. बेबीताई जनार्दन गुपीले, श्रीमती मंगला गजानन देशमुख ,सौ.डॉ.करुणा भिमराव जमदाडे, प्रा.अशोक मोरे माजी नगरसेवक यांच्या सह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळयाला उपस्थित राहणयाचे आवाहन सर्व शिक्षक कर्मचारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, हडको नविन नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button