Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लेख - The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL
लेख राजकीय August 29, 2024

The people’s election! ; लोकांनी आपल्या हाती घेतलेली लोकनिवडणूक – NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 29, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आणि ही निवडणूक लोकांनीच हाती घेतली होती, अशी चर्चा रंगू लागली. भाजप आणि मित्रपक्षांच्या पराभवाची कारणमीमांसा होऊ लागली; मात्र निवडणूक निकालापूर्वीच कोण येणार आणि कुणाला घरचा रस्ता दाखवला जाणार यांचे आडाखे मोठ्या प्रमाणावर बांधले जाऊ लागले होते. मिडियाच्या एक्झिट पोलचे सगळे अंदाज फोल ठरले असले तरी पारावरच्या, चावडीवरच्या आणि चौका चौकातल्या सर्वसामान्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की लोकांनी आपले स्वतःचे एक्झिट पोल तयार केले होते.

भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशात पूर्णांशाने लोकशाही नांदावी, तिची पाळेमुळे खोलवर रुजावीत अशी लोकशाहीप्रेमीची धारणा असते. लोकशाहीची व्याख्याही आपण तशा प्रकारचीच करतो. एकमेकांना सांगत असतो. मात्र, गेल्या काही दशकांत लोकशाहीप्रणीत आणि लोकशाहीप्रधान निवडणूक ही लोकांची राहिलेली नाही. ही खूपच गंभीर बाब आहे. येनकेन प्रकारेन निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधलेल्या राजकारण्यांनी लोकशाहीची मूल्ये निवडणुकीत पायदळी तुडविल्याची आणि त्या वाटेवरून जनतेचा महाकाय समुदाय चालत असल्याचे चित्र आपण पहात आहोत. यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की, ज्या विचारधारेचा विरोध या देशातील लोकशाहीप्रेमी जनता करते तीच विचारधारा जोपासणारी पिलावळ या देशात लोकशाहीप्रधान धर्मनिरपेक्ष गणराज्य नको असल्याचे मनसुबे बांधत आहेत. त्यांना या देशात हुकुमशाही म्हणजेच धर्माधिष्ठित राजेशाही हवी आहे. ज्यायोगे राजसत्तेच्या माध्यमातून धर्मसत्ता प्रस्थापित करता येईल. परंतु जेंव्हा लोकच ही निवडणूक हाती घेतील तेव्हा त्यांचे हे मनसुबे उधळले जातील.

२०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह देशभरात ज्या ज्या ठिकाणी निवडणूका झाल्या, त्या ठिकाणी लोकांनी ठरवून काही उमेदवारांना पराभूत केले आहे. यावेळी ईव्हीएमच्या अविश्वासाचा मुद्दा नव्हताच. लोकांनी मताधिकार केवळ योग्य पद्धतीने वापरला असे नाही तर त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणूक आपल्या हाती घेतली होती. म्हणूनच लोकांनी बांधलेले आडाखे वास्तवात उतरले आहेत. महाराष्ट्रातील ४८ जागांचा निकाल हाती आला आणि लोकांनी हाती घेतलेल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं. राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. पण भाजपप्रणित महायुतीची जोरदार पिछेहाट झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक फटका भाजपला बसला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे २०१९ च्या तुलनेत खूप मोठा फटका बसला. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. भाजपला हक्काचे मतदारसंघही गमावावे लागले, हे विशेष. २०१९ च्या तुलनेत ४०० पार म्हणणाऱ्या भाजपला २०२४ च्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला. राज्यात भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळवता आला. पण २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपला १७ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. अगदी भाजपच्या दिग्गजांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. डॉ. भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांसारख्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर मग बाकींच्याचं काय? महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण, ईडी-सीबीआयच्या विरोधकांवर होणाऱ्या कारवाया, बेरोजगारी, महागाई या स्थानिक विषयांना दिलेली बगल यांसारख्या अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात महायुतीला जबरदस्त फटका बसला. राज्याच्या विकासाचं नाव घेत भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही मतदारांनी नाकारलं असून ते सपशेल फेल ठरले आहेत.

खरं तर या लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. भाजपातील अनेक मोठी नावे या निवडणुकीत चितपट झाली; तर काँग्रेस पक्षातीलही नावांमागे मोठे वलय असलेल्या उमेदवारांना या निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यात भाजपाच्या स्मृती इराणींपासून ते काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांच्यापर्यंत अजिंक्य मानल्या जाणार्‍या अनेक नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातही भाजपला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत निवडणूक हाती घेतलेल्या जनतेने भाजपच्यअनेक दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव केला. एकेकाळी मंत्री राहिलेल्या नेत्यांनाही आपली जागा कायम राखता आली नाही. या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपमध्ये अनेक नेते सपशेल फेल ठरले.

बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे विजयी झाले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे तब्बल एक लाख १३ हजार १९९ मतांनी विजयी झाले. मतमोजणीपूर्वी भारती पवार यांनी एक लाखांच्या लीडने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला गेला होता. मात्र तेवढ्याच मतांनी त्यांचा पराभव झाला. कांदा हा या मतदारसंघात चर्चेचा विषय होता. डॉ. भारती पवार या केंद्रीय राज्यमंत्री होत्या. भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून त्यांचं कुटुंबीय उच्चशिक्षित आहे. सुरुवातीला गावाचे सरपंचपद, राष्ट्रवादीचे शाखाप्रमुख अशी पदे भूषवतांनाच पंचायत समितीची निवडणूक लढवली. त्यांनी खेडगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती. आपण खासदार होऊ हे त्यांनी स्वप्नातही पाहिलं नसावं, जिल्हा परिषद सदस्यातून आता ते थेट खासदार झाले आहेत.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रतिभा धानोरकर यांनी हरवले. त्यांना तब्बल सात लाखांहून अधिक मतं मिळाली असून थेट २ लाख ६० हजारांची लीड मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवारांसाठी हा मोठा धक्का मानला गेला आहे. सहा वेळा आमदार, तीन वेळा मंत्री राहिलेल्या मुनगंटीवारांकडे निवडणुका लढवण्याचा आणि व्युहरचना आखण्याचा चांगला अनुभव आहे. त्याशिवाय ते चंद्रपुरातून पालकमंत्री असल्याकारणाने त्यांच्याकडे जमेची बाजू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेऊन मुनगंटीवारांचा प्रचार केला. मात्र तरीही त्यांना आपली जागा राखता आली नाही. २०२१ मध्ये केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री झालेले कपिल पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी पराभव केला. बाळ्या म्हात्रे यांना जवळपास पाच लाख मतं मिळालीत. त्यांनी कपिल पाटील यांचा ६६ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. केंद्र सरकारच्या पंचायती राज्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांची निवड करण्यात आली होती.

त्यांच्या अपयशाने भाजपला मोठा धक्का बसला. भिवंडी, पालघर या मतदारसंघात संघ आपलं जाळं पसरवत आहे. येथील काही पट्ट्यात शिंदेंच्या शिवसेनेचाही जोर आहे. दरम्यान या भागातील मुरबाड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे किसन कथोरे या विद्यमान आमदारांनी भाजपविरोधी काम केल्याचा आरोप भाजप नेते जगन्नाथ पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. तसेच २०२९ च्या निवडणुकीत तीन लाखांहून जास्त मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे यांनाही यंदाच्या निवडणुकीत जबर फटका बसला आहे. भाजपचे रावसाहेब दानवे सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे दानवेंची जालना मतदारसंघात मजबूत पकड होती. यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांना फटका बसल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वहिनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निकालामुळे बारामतीवर शरद पवारांचंच वर्चस्व असल्याचं सिद्ध झालं. अजित पवार त्यांच्या काकांची साथ सोडून महायुतीत सहभागी झाले. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पण, आपल्या घरातील व्यक्तीला खासदार करण्यात अजित पवारांना पुन्हा एकदा अपयश आलं. कारण लोकांनी जे ठरवलं तेच केलं. गेल्या लोकसभा निवडणुकीतही अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता. धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपचे सुभाष भामरे यांचा पराभव केला.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कलम ३७०, राम मंदिर यां‌सह विविध मुद्दे चर्चेत आल्याने नाराज झालेल्या मुस्लिम मतदारांकडून काँग्रेसला पसंती मिळेल, असे देखील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात ६० टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा डॉ. शोभा बच्छाव यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि ते खरंच ठरलं. आता थोडे मुंबईकडे वळू या. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसमधून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून भाजपच्या तिकीटावर उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली होती. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या उज्वल निकमांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही. त्यांना विजय मिळवून देण्यासाठी भाजप आशिष शेलारही मैदानात उतरले होते. मात्र काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ही जागा राखली. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाईंनी बाजी मारली. दोन वेळा खासदार राहिलेल्या राहुल शेवाळेंविरोधात ५० हजारांहून अधिक मतांची लीड मिळाली.

महाराष्ट्रातील या जागांचा हा लेखाजोखा मांडला आहे, यावर आत्तापर्यंत महाचिंतन झाले असेलच. कारण सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सद्या विधानसभा मतदारसंघावर दावे ठोकण्यात येत आहेत. निवडणुकीला सामोरे कसे जायचे याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकांना दारु, पैसा आणि अनेक अशी आमिषे दाखवून तसेच देऊन निवडणूकीची प्रक्रियाच बदलवून टाकली गेली होती. वरिष्ठ स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत ही प्रक्रिया सडत चालल्याचे उघड्या डोळ्यांनी आपण पहात आहोत परंतु काहीच करु शकत नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. नेते आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरवतात.

विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या निवडणूकांच्या माध्यमातून हे जाळे पसरवले जाते. निवडून आल्यानंतर किंवा सत्ता आल्यानंतर पुढील पाच वर्षांत हे नेते आपल्या चेल्याचपाट्यांना कामं देतात. वैयक्तिक स्वरुपाचीही कामं केली जातात. त्यामुळे यांना आपला नेताच हवा असतो. तो किंवा त्याची बायको तसेच त्याचेच पोरं पोरी निवडून आणण्यासाठी हे तळागाळातील कार्यकर्ते जिवाचे रान करतात. निवडणुकीच्या काळात यांच्या पायाला जणू काही भिंगरीच बांधलेली असते. हेच चित्र सर्वत्र दिसते. पण हे चित्र स्वतःच बदलू पहात आहे. आता कुणालाही पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येणार नाही. आपल्याच पक्षाच्या बहुमतावर हुकुमशाही आणता येणार नाही.

निवडणूकांत लोकं पाहिजे तेवढे पैसे घेतील, इतर आमिषेही स्विकारतील पण लोकं मोठ्या प्रमाणावर निवडणूक हाती घेतील. लोकं विकासाचा मुद्दा पुढे करतील. लोकं आता घराणेशाही संपविण्याचाही विचार करतील. लोकांना कोणत्याही एक्झिट पोलची गरज पडणार नाही. कोणत्याही पक्षाने दिलेला कोणताही उमेदवार चालेलच असे नाही. लोकं विचार करु लागले आहेत. आर्थिक स्वार्थाचा राजकीय गोंधळ लोकांना आवडलेला नाही. लोकांना आता फसवणं शक्य नाही. लोकं आता जाणकार झाले आहेत. लोकंच आता निवडणुकाच हाती घेऊ लागले आहेत.

महाराष्ट्रातील येणारी विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. पावसाळ्यात भूछत्रे उगवल्यासारखे अनेक नेते आपापल्या मतदारसंघात उगवत आहेत. मेळावे घेत आहेत. जाहिरातबाजी करीत आहेत. आपणच कसे प्रबळ दावेदार आहोत हे सांगण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. पुढील काळात कधीही आचारसंहिता लागू होईल या विचाराने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासन सज्ज झाले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत निवडणूक झाली तरी तोपर्यंतचा वेळ फार महत्त्वाचा आहे. अनेक योजना जन्माला घालून मतदार राजाला राजेपण बहाल करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्रात विकासाचे मुद्दे तेच आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, बेरोजगारी, महिलांची असुरक्षितता, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक तत्सम प्रश्नांनी महाराष्ट्राला घेरले आहे. येणारी प्रत्येक निवडणूक आता सोपी नाही, हे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांसह हितचिंतकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

लेखक…. प्रज्ञाधर ढवळे, नांदेड. मो. 9890247953

The people's election!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSardar Ravneet Singh Bittu ; रेल राज्यमंत्री सरदार रवनीत सिंघ बिट्टूजी याना गुरु का खालसा संस्थेसह भाविकांचे निवेदन – NNL
Next Article Yellow alert issued : नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

आंतरराष्ट्रीय स्तरावर शल्यचिकित्सेत नांदेडचे सुपुत्र डॉ. प्रदीप जाधव यांचे अतुलनीय योगदान – NNL

October 18, 2024

Ramnavmi mla bhimrao keram ; श्रीराम नवमी निमित्त आमदार भीमराव केराम यांनी प्रभू श्रीराम मंदिरात केली महापूजा

April 7, 2025

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

January 30, 2025

Five lakh applications are eligible : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र -NNL

August 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Bhadanta Payyabodhi Thero : धम्मचळवळीचे नवे दायाद – भदंत पंय्याबोधी थेरो

Vidhan Parishad Election | विधानपरिषदेच्या 11 जागांचे निकाल जाहीर -NNL

‘Mazi Vasundhara Abhiyan’ ; ‘माझी वसुंधरा अभियानात’ मराठवाड्यात शिराढोण ग्रामपंचायत प्रथम – NNL

Dr. Hansraj Vaidya ; 13 जुलैला ज्येष्ठ नागरिकांचा भव्य ” आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे पहा निट ठिय्या अंदोलन! डाॅ.हंसराज वैद्य

शनि मंदिर देवस्थान येथे शनि जन्मोत्सव सोहळा उत्साहात, महापूजा,अभिषेक व महाप्रसादाचे वाटप -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?