HomeनांदेडRam Gadhe Patil : लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..! राम गाढे पाटील यांनी...

Ram Gadhe Patil : लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..! राम गाढे पाटील यांनी पुरविला लेकीचा बालहट्ट -NNL

नांदेड| येथील आनंदनगर भागातील फायनान्शियल ॲडव्हायझर राम गाढे पाटील यांनी त्यांच्या सहा वर्षीय कन्येच्या वाढदिवसानिमित्ताने लेकीच्या बालहट्टा खातीर रक्तदान करून वाढदिवस साजरा केला.

याविषयी सविस्तर वृत्त असे की राम गाढे पाटील यांची कन्या अयोध्या हिचा २७ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त कुमारी आयोध्या हिने वडिलांकडे इच्छा व्यक्त केली ती म्हणजे ती म्हणाली की,पप्पा तुम्ही पण माझ्या बर्थडेला ला रक्तदान करा ना, लोकं कसे राजकारणी लोकांच्या बर्थडे ला ला रक्तदान करतात..तिच्या या बाल मनाच्या इच्छे खातीर वडिलांनी मुलगी अयोध्या च्या जन्मदिवशी जिजाऊ ब्लड बँक शिवाजीनगर येथे स्वतः आपल्या कन्या समवेत जाऊन रक्तदान करून समाजापुढे एक नवा पांयडा प्रस्थापित केला आहे

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनीही केले होते अयोध्या हिचे कौतुक …!
मनोज जरांगे पाटील यांच्या जूलै महिन्यातील नांदेड दौऱ्या दरम्यान कू. आयोध्या हिने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर कविता सादर करून अनेक उपस्थितांची मन जिंकली होती तिच्या या कवितेबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी तिची जवळ घेऊन स्तुती केली होती व व या चिमुकलेच्या हुशारीचे तोंडभरून कौतुक केलं होतं…

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments