Homeनांदेडश्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद...

श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड/हदगाव| श्रावण मासानिमित्त हदगाव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमी सणातील शिराळ ऑनलाईन सजावट स्पर्धेला माहोलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच भव्य वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, या दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण आज हदगाव येथे करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांच्या वतीने नागपंचमीनिमित्त शिराळ ऑनलाइन सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 21 स्पर्धकांनी भाग नोंदविला असून, त्या स्पर्धकांनी सुंदर अशा प्रकारची सजावट करून आणि विविध गाण्यांचा त्यात समावेश करून तो व्हिडिओ पाठवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

IMG 20240825 WA0059 श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

तसेच दिनांक १९ रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्या आले होते. या स्पर्धेसही ९३ स्पर्धकांनी सहभाग घेल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचे नियोजन करून वक्तृत्व स्पर्धा यशस्वी झाली आहे. आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता संत रोहिदास सभागृह, हदगाव येथे शिराळ सजावट आणि वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, जिजाऊ ब्रिगेड, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. भारती मढवई, हदगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांची उपस्थिती होती.

IMG 20240825 WA0055 श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांना बक्षिस देऊन मान्यवरांच्या हसे गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला मंडळी आणि मान्यवर नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments