Homeसोशल वर्ककिनवट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसविणे करिता उपोषण -NNL

किनवट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर बसविणे करिता उपोषण -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महाराजांच्या राज्याभिषेक दिनी म्हणजेच 6 जून 2023 रोजी ढोल ताशाच्या मिरवणुकीसह किनवट शहरात आणण्यात आला. पण 14 महिने उलटून गेले तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीच्या प्रक्रियेला नगरपरिषद किनवटला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

प्रशासनाची परवानगी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्वरित पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी. गजानन कोल्हे मा. उपसभापती पंचायत समिती किनवट, शाम रावसाहेब मगर रा.आंदबोरी (चि.) ता.किनवट, चंद्रकांत प्रकाश साळवे रा. मांडवा (कि.) ता. किनवट हे ज्येष्ठ मार्गदर्शक वैजनाथ करपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद किनवट समोर आमरण उपोषणास बसले आहे.

नगरपरिषद किनवटच्या अग्निशमन कार्यालयामध्ये बंदिस्त करून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित ठिकाणी बसविण्यात यावा यासाठी अनेक दिवसापासून शिवप्रेमी निवेदने, उपोषण, आंदोलने, अशा अनेक प्रकारे पाठपुरावा करीत होते परंतु नगरपरिषद प्रशासन कुंभकर्णी झोप घेत त्यावर कुठलाही निर्णय घेत नव्हते अखेरीस शिवप्रेमींयांचा संयम संपला असून आता शिवप्रेमी अखेरचे आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आता तरी संबंधित प्रशासनाला जाग येऊन महाराजांचा पुतळा तातडीने स्थापित करावा अन्यथा प्रशासनाला शिवप्रेमीचे आंदोलन पेलणे कठीण जाईल. अशा तीव्र प्रतिक्रिया शिवप्रेमी कडून येत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments