नांदेड| शहरातील सोलार क्षेत्रातील अव्वल वितरक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोही सोलारचे संचालक श्री अतुल देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर दि.१८ ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट घेतली व सोलर संदर्भातल्या .विविध विषयावर चर्चा केली यावेळी त्यांनी सोलार वितरकांच्या तांत्रिक अडचणींकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
आरोही सोलार ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील सात वर्षापासून सर्वात उत्कृष्ट पद्धतीने सोलार प्रोजेक्ट कम्पलेट करणारी एकमेव एजन्सी आहे आणि मराठवाड्यातील पहिली सोलर मेंटनस एजन्सी आहे ज्याठिकाणी सोलार ग्राहकांना अनेक अडचणीवर त्वरीत तत्परतेने सेवा दिली जाते व त्याबरोबरच सोलार संदर्भातील विविध समस्यांवर तातडीने निराकारण केले जाते.
आरोही सोलर एजन्सीचा सोलार क्षेत्रामध्ये सक्सेस रेट शत प्रतिशत असून लुम सोलार या भारतातील सर्वात मोठ्या सोलार कंपनीचे सोलार अंत्यत वाजवी दरात त्यांच्याकडे उपलब्ध असून ते लुम सोलार कंपनीचे अधिकृत मराठवाडा सुपरस्टॉकीस्ट म्हणून कार्यरत आहेत.