Homeनांदेडcome Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी...

come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी इस्लापूर परिसरात विकासात्मक कामाचा झपाटा लावला असून तब्बल एक कोटी 75 लक्ष रुपयांच्या कामांना मंजुरी इस्लापूर या ठिकाणी देण्यात आली. त्यामध्ये समाज मंदिर रस्ते असे विविध कामे आमदार निधी व इतर योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आली.

विशेषतः गेल्या 35 ते 40 वर्षापासून ग्रामस्थांकडून सातत्याने जिल्हा परिषद शाळेकडे गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या मागणी पाठपुरावा केला होता पण अद्याप पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने या बाबतीत लक्ष केंद्रित केले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य रस्ता सोडला तर कुठल्याही रस्त्याने शाळेला जाता येत नव्हते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर सारखी वर्दळ असायची त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले होते. सदरील कामावर प्रत्यक्ष जाऊन आमदाराने जातीने लक्ष वेधून या कामाची पाहणी केली. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावरील हास्य पाहूण आमदारांनी समाधान व्यक्त केले.

IMG 20240821 WA0017 come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

सदरील काम दर्जेदार पद्धतीने व वेळेच्या आत पूर्ण केल्याने केल्यामुळे या कामाचे गुत्तेदार विजय घोगरे यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले. इस्लापूर परिसरातील सर्वच कामी दर्जेदार स्वरूपाची व्हावी ही अपेक्षा सुद्धा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. मतदारसंघांमध्ये कुठलेही विकासात्मक काम करताना मी जातपात बघितली नाही ना मला या गावातून किती मतदान पडले हे सुद्धा मी बघितले नाही मी लोकप्रतिनिधी असल्याने माझ्या मतदारसंघाचा विकास करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. विकासाच्या बाबतीत झालेल्या कामाची व शासनाच्या राबवण्यात येणारे योजनेची भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी व निराधार चे प्रश्न असो लाडली बहिणीचे प्रश्न असो सोडवावीत अशा सूचना सुद्धा याप्रसंगी आमदार भीमराव केराम यांनी दिल्या.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी किनवट विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे किनवट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, आदिवासी नेते गोविंद अंकुरवाड , माजी उपसभापती कपिल करेवाड, सा. पोलीस निरीक्षक उमेश भोसले, अभियंता श्रीराम पाटील, कमलबाई देशमुख,तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बोनगीर, मा.सरपच देविदास पळसपुरे,भाजपा सचिव काशिनाथ शिंदे, माधव बोंबले, राजलिंग चटणे पांडुरंग जाधव रमेश पडवळ,पेवे सर,सुर्यकांत बोधनकर, रवी कसबे, प्रकाश दंडे सरपंच प्रतिनिधी नारायण शिनगारे, ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार, श्रीधर रेड्डी, भूमेष किनी , संचालक सत्यनारायण जाधव, बालाजी काळे, यांच्यासह परिसरातील भाजपाचे अन्य पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments