HomeBlogVishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी...

Vishnupuri ; तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, गावकरी मंडळी विष्णुपूरी यांच्या वतीने महाप्रसाद – NNL

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील पंचक्रोशीतील व शहरालगत असलेल्या जागृत व हजारो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपुरी येथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी भाजपाचे डॉ. संतुकराव हंबर्डे, युवा नेते नरसिंग हंबर्डे यांनी विधीवत पुजन करून दर्शन घेतले तर ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता , विश्वस्त समिती यांच्या वतीने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती.नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्ताने सकाळपासून भाविक भक्तांची मोठया संख्येने दर्शना साठी गर्दी केली होती.

१९ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने रात्री पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, पुजारी रामेश्वर अप्पा महाराज धनमणे ,सतिश धनमणे,यांच्या उपस्थितीत विधीवत पुजन व आरती नंतर दर्शनासाठी भाविक भक्तांना सोडण्यात आले, सकाळी डॉ. संतुकराव हंबर्डे ,नरसिंग हंबर्डे यांनी तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात विधीवत पुजन केले. यावेळी ग्रामपंचायत विष्णुपूरी सरपंच प्रतिनिधी राजु हंबर्डे, उपसरपंच प्रतिनिधी विश्वनाथ हंबर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबरडे,विश्वस्त समितीचे सचिव शंकरराव हंबर्डे, धारोजी हंबर्डे, मारोतराव हंबर्डे , बालाजी हंबर्डे, सतिश भेंडेकर,गणेश धनमणे, गंगाधर वाघमारे यांच्या सह गावातील युवकांनी सहकार्य केले.

भाविक भक्तांसाठी विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तिसऱ्या श्रावण सोमवारी होणारी भाविक भक्तांची गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी अधिकारी, पोलीस अमलंदार, महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंदीर परिसरात भाविक भक्तांसाठी बेल फुळ,फुलाचे , मुर्ती दुकाने व खेळणी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्री साठी आली होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments