नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे दि. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पहेलवान गु्रप प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा वाहिनी संघटन, एसटी महामंडळ कामगार- कर्मचारी, विश्वासू प्रवाशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान व आरोग्य शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला व प्रवाशी बांधव व कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. डॉ. हरदिपसिंघजी व डॉ. जयंत माळाकोळीकर यांनी या शिबीरात आरोग्य तपासणी केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडसकर हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, धर्मभूषण अॅड. दिलीपभाऊ ठाकूर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी सौ. वंदनाताई चापोलीकर, विश्वासू प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर, कास्ट्राईब रा.प. संघटनेचे विभागीय अध्यक्षा आम्रपाली शेळकीकर, इंजि. वैशाली गोदमवाड, आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक निरीक्षक आकाश भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी या रक्तदान शिबीराचे मुख्य संयोजक नंदू पाटील बेंद्रीकर, अभिषेक ताकझुरे, रामदास पेंडकर, बाळू पेंटेवाड, स. हरजिंदरसिंघ संधु यांनी वरील सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पहार देऊन हृदय सत्कार केला. याप्रसंगी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे होऊन या शिबीराला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पाटील बेंद्रीकर यांनी केले तर सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
शेवटी आभार प्रदर्शन अभिषेक ताकझुरे यांनी मांडले. हे शिबीर यशस्वीतेसाठी रामदास पेंडकर, अभिषेक ताकझुरे, बाळू पेंटेवाड, नंदू पाटील बेंद्रीकर, गुणवंत एच. मिसलवाड, गोविंद विभूते, अयुबखान पठाण खुरगावकर, आदित्य पाटील बेंद्रीकर, शिवकुमार भाऊ बोईनवाड, भास्करभाऊ गच्चे, एम.जी. भुजबळ, धवलसिंघ परमार, अनुराग पेन्शलवार, अवतारसिंघ परमार, प्रथमेश औसेकर, हरप्रितसिंघ पथरोड, सोनू गंजेवार, अतुल वाघमारे, कुमार कांबळे, मारोती वाघमारे, मंगेश कांबळे, शैलेश गजभारे, साई अनंतवाड, शिवाजी निरडे, सचिन कोटपेट, मनोज पाटील, गणपत पाचंगे, सरदार हरजिंदरसिंघ संधू यांनी मोलाचे परिश्रम घेतले.