blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे दि. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पहेलवान गु्रप प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा वाहिनी संघटन, एसटी महामंडळ कामगार- कर्मचारी, विश्वासू प्रवाशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान व आरोग्य शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला व प्रवाशी बांधव व कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. डॉ. हरदिपसिंघजी व डॉ. जयंत माळाकोळीकर यांनी या शिबीरात ...
