
किनवट, परमेश्वर पेशवे| फुटबॉल खेळल्याने तग धरण्याची क्षमता आणि वेग वाढते , मेंदूला चालना मिळते, निर्णयक्षमता वाढते, एकाग्रता आणि समन्वय सुधारतो, टीमवर्कला प्रोत्साहन मिळते, संघटन कौशल्य विकसीत होते व आत्मविश्वास वाढतो. तसेच फुटबॉल खेळणाऱ्यांची हाडे पोहणारे किंवा सायकलिंग करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक मजबूत होतात. फुटबॉल खेळणे एक उत्तम प्रभाव असलेला व तीव्र व्यायाम आहे. असे प्रतिपादन पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला यांनी केले.


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने येथील तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024 अंतर्गत ” फुटबॉल स्पर्धेचे ” उदघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी(चि)चे प्राचार्य एस. व्ही. रमणराव , फूटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू जगदीश गालेवार , क्रीडाशिक्षक प्रेमअमर तांदळे, ब्रदर मायकेल, विष्णू, समीर पठाण , निलेश लाजूरकर, श्रीदेवी दहिफळे, संतोष तलांडे मंचावर उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२४ – २५ चा फुटबॉल स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे :- १४ वर्षा आतील (मुले) : प्रथम : सेंट मेरि’स इंग्लीस स्कुल, कोठारी (चि), द्वितीय : ज्ञानज्योती पोदार लर्न स्कुल, बेंदी १७ वर्षाआतील मुले : प्रथम :- सेंट मेरि’स इंग्लीस स्कुल कोठारी (चि), द्वितीय : मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल , कोठारी (चि), तृतीय : ज्ञानज्योती पोदार लर्न स्कुल, बेंदी १७ वर्षा आतील मुली : प्रथम :- मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल , कोठारी (चि), १९ वर्षा आतील मुले : प्रथम – महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंदा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी डॉ. अमोल पवार, एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रसाद जकाते व विशाल गायकवाड यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.


जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे व तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संयोजक राष्ट्रीय कोच संदीप यशिमोड यांनी तातुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांच्या सहकार्याने या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संकुलचे कर्मचारी मारोती यशिमोड व आतिश तामगाडगे यांनी परिश्रम घेतले.




