हदगाव | नादेड जिल्ह्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर जिल्ह्यातील सर्वात जुना तालुका म्हणून हदगाव तालुक्याची ओळख विकासाच्या दृष्टीने तर मागासलेला आहेच या पेक्षा अनेक समस्यांच्या विळाख्यात आडकलेला आहे .
हदगाव तालुक्याला निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इथल्या नागरिकना व राजकीय कार्यकर्त्यां ना लय भाव येतो येथील निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधिचा व त्यांच्या काही जवळच्या विश्वासुचा भरपुर विकास होतो परंतु निवडणूक संपल्या व निवडून आले की माञ लोकप्रतानिधीच माञ फार दुर्लक्ष होतो कुठले तरी संधी साधू येणा-यांची संख्या माञ वाढतांना दिसुन येते निवडणूक काळात हवे असणारे स्थानिय कार्यकर्ते माञ निवडणूक झाली.
की हे सर्वसामान्य कार्यकर्ते लोकप्रतिनिधीना नकोसे वाटतात ही वस्तुस्थिती आहे या मुळे आता संभव्य भावी आमदारांना ही हे कार्यकर्ते ही ‘ पानी तेरा रंग कैसा’ असेच वागु लागल्याचे चिञ सध्या तरी तालुक्यात पाहयवास मिळत आहे. हदगाव तालुका समस्याचे माहेरघर असल्याच आता तालुक्यातील जनतेला जानवत आहे लोकप्रतिनिधीच माञ अक्षम्य दुर्लक्षह झाल्याने तालुक्यात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांना प्राथमिक गरजापासुन अनेकांना दररोज तोड दियाव लागत आहे तालुक्यात मुख्य म्हणजे आरोग्य समस्या विषयी एवढी गंभीर आहे.
की शहरात उपजिल्हा रुग्णालय असुन ही तिथे अवश्यक त्या सुविधा दिसुन येत नाही रक्तचे नमुने हिमायतनगर तालुक्यात पाठविण्यात येतात शहराच्या उपजिल्हारुग्णालयाची अशी अवस्था असेल तर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची काय अवस्था असेल, तालुका आरोग्य अधिकारी नेमके कोण आहेत. हे सुद्धा बहुसंख्य नागरिकांना माहीत नाहीत इथल्या नागरिकांनी रक्त पेढीची अनेक वेळा मागणी करुन ही त्याची साधी दखल घेण्यात येत नाही इथल्या स्टेट बँक आँफ इडीया हदगाव शाखेच्या शेतक-याच्या फायली पीककर्ज मंजुरी करिता किनवट तालुक्याच्या शाखेत पाठविण्यात येतात तेथून मंजुरी मिळवायला फार उशीर होतो. तालुक्यातील मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत गावाकडुन शहराकडे येजा करणा-या मुलीची तर फार गंभीर अवस्था त्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना समोर जावे लागत आहे.
हदगाव बस्थानकाच वेळापञक पार कोलमडेलल असुन सर्वात जुन्या व भंगार एसटी बसेस हदगाव एसटी आगाराला देण्यात येतात ह्या भंगार बस मधुनच नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे शहरासह तालुक्यात विजेचा लपंडाव राञीला व दिवसाला वीज खडीत होते विजेची समस्या फार गंभीर बनलेली आहै यामुळे अनेक समस्या दररोज निर्माण होतांना दिसुन येतात हदगाव तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो हदगाव शहरात व तालुक्यात लाखो नव्हे करोडो रु निधी विविध पक्षाचे कार्यकर्ते आणत असल्याच सागण्यात येते तर मग तालुक्याचे लोकप्रतिनिधी मुंबईला काय करतात असा सवाल ही तालुकूयातील जनता करित असतांना दिसुन येत आहे अश्या अनेक जीवलग समस्या हदगाव शहरासह तालुक्यात ‘आ’ वासुन उभ्या असतांना माञ लोकप्रतिनिधी माञ याबाबतीत ‘मौण ‘ पाळल्याचे दिसुन येत आहे.
या पुर्वी आढावा बैठक लोकप्रतिनिधीच्या प्रमुख उपस्थिती व्हायची त्या मध्ये तालुक्यातील प्रमुख नागरीक संरपच सह तालुक्यातील स्थानिक पञकारांना पण निमञित करण्यात येवून संबंधित विभागाच्या अधिका-याना प्रश्न विचारण्याची लोकप्रतिनिधी कडुन मुभा होती. आता तर पंचायत समिती महसुल कृषि. महावितरण सामाजिक वणीकरण पोलिस स्टेशन दुय्यम निबंधक भूमि अभिलेख गटशिक्षण. महीला व बालविकास यासह आढावा व्हायच्या आता माञ ह्या संबंधित अधिका-याच्या बैठकी थेट लोकप्रतिनिधी सोबत होत असल्याना स्थानिक माध्यामाना ह्या बैठकी पासुन दुर ठेवण्यात आलेले आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल …!