Shambhuraj Desai ; राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा दौरा-NNL

नांदेड| राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार 10 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथून विमानाने सकाळी 11 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने मुखेडकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता मुखेड येथे आगमन व मातंग समाजाच्या भव्य मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता मुखेड येथील शिवसेना पक्षाच्या शाखेचे उदघाटन. दुपारी 2 वाजता मुखेडहून खतगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता श्री. बालाजी खतगावकर मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 3.15 वाजता खतगाव येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सायं 4 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button