नांदेड| सामान्य जनतेच्या समस्यांकडे राज्यातील महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्याक्ष राजेश पावडे यांच्या पुढाकाराने शुक्रवार (ता.८) रोजी आयटीआय चौक येथे खोके आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. वसंतराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. दरम्यान खोके आंदोलनात नागरिकांच्या विविध समस्येवरुन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले जाणाऱ्या तक्रार निवारण खोक्यात नागरिकांनी लिखित समस्या टाकून आंदोलनास प्रतिसाद दिला.
खा. वसंतराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांच्या पुढाकाराने शुक्रवार (ता.८) रोजी आयटीआय चौक येथ राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ, खोके आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. वसंतराव चव्हाण, संयोजक राजेश पावडे, माजी नगरसेवक फिरोज भाई, जिल्हा सरचिटणीस विलास पावडे, दिपकसिंग हजूरीया, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, जिल्हाप्रवक्ते बापूसाहेब पाटील, तातेराव शिंदे, भिवाजी कदम, राहुल वाघ, नवनाथ कदम,तोलाजी जनकवाडे, चंपतराव पाटील, कालीदास कोरके, मधुकर सोनटक्के, माजी नगरसेवक ——, संतोष भोसले, कलीम शेख, तुषार पोहरे, अजहर शेख, संजय वाघमारे, रिजवान पटेल, अनसार पठाण, गणेश कोकाटे, अनिल कदम, चंद्रकांत क्षिरसागर, ओमकार शिंदे, संतोष कदम, मनोहर बोकारे, गजानन जाधव, किरण जाधव, साहिल शेख, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
सामान्य जनतेचा आवाज शासन दरबारी बुलंद करण्याचे काम राजेश पावडे हे करत आहेत. हीच काँग्रेस कार्यकर्त्याची खरी ओळख असल्याचे खा. वसंतराव चव्हाण यांनी म्हटले आहे. सामान्य जनतेच्या, समस्यांकडे राज्यातील महायुती सरकारचे लक्ष नाही. शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे, शहरातील रस्ते खड्डे मुक्त झालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या कृषि पंपावरील विद्यूत जोडणी तोडता कामा नये, शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा, शहरातील रस्ते, ड्रिनेज, कचरा आदी नागरी सुविधांचा बोजवारा झाला आहे. आदी प्रश्न तातडीने मार्गी लावले गेले पाहिजेत. महागाई नियंत्रणात आणली गेली पाहिजे, तरुणाईला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आदीसह इतर जनतेचे प्रश्न मुख्यमंत्री यांच्या कार्यालयापर्यत पोहचवले पाहिजे.
राज्य सरकारला नागरी समस्येवर जाब विचारायला हवा, या उद्देशाने खोके आंदोलन करत असल्याचे संयोजक तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजीसह निदर्शने करण्यात आली. दरम्यान कागदी खोके असलेली समस्या निवारण पेटी (खोके) मतदारसंघात फिरविणार असून यात नागरिकांच्या समस्या चिठ्ठी स्वरूपात जमा करून मुख्यमंत्री कार्यालय येथे पाठविणार असल्याचे देखील जिल्हा कार्याध्यक्ष तथा खोके आंदोलनाचे संयोजक राजेश पावडे यांनी सांगितले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस विलास पावडे, गोविंद पाटील,प्रथमेश गिरी, विशाल जाधव, भोजने, गणेश पावडे, शैलेश गजभारे आदीसह राजेश पावडे मित्रमंडळाने परिश्रम घेतले.